विशेष प्रतिनिधी
मुंबई : महामुंबई क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी साठा वेगाने वाढला आहे. अवघ्या २४ तासांत तब्बल ३२ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे.Huge water collection in Mumbai dams
जुलै महिन्याचा पहिला पंधरावडा उलटून गेल्यानंतर तलाव क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट येऊन ठेपले होते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून महामुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे.
त्यामुळे तलावांमध्ये रविवारी दोन लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता, सोमवारी तोच चार लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटरवर पोहोचला. म्हणजे अवघ्या २४ तासांत पाणी साठा तब्बल एक लाख २८ हजार ९३ दशलक्ष लिटर जमा झाला.
पाणीसाठ्यावर तसेच तलाव क्षेत्रातील पावसाचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे, असे पालिकेच्या पाणी खात्याकडून सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App