चार दिवस सासूचे संपलेत, आता सुनेचे दिवस सुरू झालेत, किती दिवस तिला बाहेरची म्हणणार??; अजितदादांचा संतप्त सवाल!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या घरांच्या दोन महिला एकमेकींच्या समोर उभ्या ठाकल्याने काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत काकांनी आपल्या चुलत सुनेला “बाहेरून आलेली पवार” असे म्हटले. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांनी त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी मौन बाळगले, पण पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार मात्र संतापले.However, Ajit Pawar was angry on Pawar’s statement

बारामतीतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अक्षरशः वाभाडे काढले. तुम्हाला नुसती भाषण करणारा खासदार हवा आहे की काम करणारा खासदार आहे, तुम्हाला ठरवायचं आहे. देशातली मोदींची गॅरंटी आणि महाराष्ट्राची आमच्या सरकारची गॅरंटी एकत्र करून बारामतीचा विकास साधायचा आहे. समोरचे लोक नसता वाद उखडून काढत आहेत. सारखं आपलं सासू-सासू करत आहेत. पण आता चार दिवस सासूचे संपलेत आणि सुनेचे दिवस सुरू झालेत. किती दिवस तिला बाहेरची म्हणून हिणवणार?? आमच्या लग्नाला 40 वर्षे झालीत. घरची लक्ष्मी म्हणून आपण सुनेला मानतो. ते तुम्ही मानणार की नाही??, असा बोचरा सवाल अजितदादांनी शरद पवारांना उद्देशून केला.

इतकेच नाही तर, बघा बाबा आया बहिणींनो हे घरच्या सुनेला कसे बाहेरचे म्हणून हिणवतात, ते तुम्ही नीट लक्षात घ्या, असे अजितदादांनी हात जोडून तिथे हजर राहिलेल्या महिलांना सांगितले.

शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना “बाहेरून आलेली पवार” म्हटल्याबद्दल स्वतः सुनेत्रा पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले आहे. पण अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र पुरते संतापले आहेत रूपाली चाकणकरांपासून ते अजितदादांपर्यंत प्रत्येक जण शरद पवारांच्या वक्तव्यावर रोज शरसंधान साधतो आहे. शेवटी पवारांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत आपल्याला कसे म्हणायचे नव्हते, असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. पण तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या सःतापात कमी झालेली नाही. त्या संतापासून राष्ट्रवादीतून राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे वाभाडे काढले. घरच्या लक्ष्मीला तुम्ही किती दिवस बाहेरून आलेली म्हणणार आहात??, आता सुनेचेच दिवस सुरू झालेत, असा इशारा त्यांनी दिला.

However, Ajit Pawar was angry on Pawar’s statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात