गृहमंत्री वळसे पटलांनी दिले निर्देश ; म्हणाले – महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली लवकरात लवकर जाहीर करा

मार्गदर्शक नियमावलीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या.Home Minister Valse Patel gave instructions; Said – Announce guidelines for women’s safety as soon as possible


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपण पाहतो विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करीत आहेत. या सर्व महिलांची सुरक्षा हा राज्य शासनाच्या दृष्टीने महत्वाचा विषय असून गृह विभागाने यासंबधीत सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

राज्यातील माहिती तंत्रज्ञान प्रकल्प असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच मार्गदर्शक नियमावलीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या.



महिला विविध क्षेत्रात कामाच्या निमित्ताने रात्री उशीरापर्यंत बाहेर असतात.त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभागाच्या नियमांचे तसेच वेळोवेळी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीचा अभ्यास करून गृह विभागाने लवकरात लवकर मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.

तसेच यावेळी प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर मुख्य सचिव, गृह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Home Minister Valse Patel gave instructions; Said – Announce guidelines for women’s safety as soon as possible

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात