सातारा येथील हिरकमणी महिला रायडर्स ग्रुपच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून दर्शन यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षा जनजागृती साठी काढण्यात आली होती.Hirkani of Satar dies in accident, truck hits Ardhapur taluka, operation remains incomplete
विशेष प्रतिनिधी
अर्धापूर : सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे, याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील हिरकणी महिला रायडर्स ग्रुपने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता.
यात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुचाकीवरून साडेतीन शक्तीपीठाची यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करणे तसेच या उपक्रमात लोकांना रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी या महिला रायडर्स निघाल्या होत्या. याच प्रवासा दरम्यान साताऱ्यातील प्रसिध्द हिरकणी महिला रायडर शुभांगी पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
हा अपघात मंगळवारी सकाळी (ता. १२) सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भोकर फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. यात शुभांगी पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सातारा येथील हिरकमणी महिला रायडर्स ग्रुपच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून दर्शन यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षा जनजागृती साठी काढण्यात आली होती. या यात्रेला रविवारी सुरुवात झाली. ही यात्रा कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तश्रृंगी या साडेतीन शक्तीपिठाची अशी ह़ोणार होती.
या यात्रेची दहा जिल्हे, २५ तालुके, एक हजार ८६८ किलोमीटर प्रवास करुन शूक्रवारी (ता.१५) सातारा येथे सांगता होणार होती. या यात्रेला सातारा येथील पवई नाका परिसरातील शिवतीर्थपासून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला होता.
ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App