विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांसोबत चकमकीत नक्षलवादी नेता मिलींद तेलतुंबडे ठार झाला. माओवादी पक्षाच्या सेंट्रल ब्युरोचा सदस्य असलेला मिलींद तेलतुंबडे उच्चशिक्षित होता. कामगार नेता म्हणून काम करत असताना नक्षलवादी विचाराने प्रभावित झाला. १९९६ मध्ये म्हणजे २६ वर्षांपूर्वी त्याने घर सोडले. त्यानंतर पुन्हा घरी परतलाच नाही.Highly educated Milind Teltumbde’s labor leader to Naxalite journey, never to return after leaving home 26 years ago
गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्र अंतर्गत हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात शनिवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तुफान चकमक झाली. ज्यामध्ये 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. याचवेळी नक्षलवाद्यांचा नेता समजला जाणारा मिलिंद तेलतुंबडे हा देखील ठार झाला. याच मिलिंद तेलतुंबडेवर तब्बल 50 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होते.
त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे यवतमाळ जिल्ह्याच्या राजुरा गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले होते. त्यानंतर तो शिक्षणसाठी वणी येथे गेला. त्याला चार भाऊ आणि तीन बहिणी आहे. मिलिंद तेलतुंबडे हा सहावा नंबरचा घरात होता. एल्गार प्रकरणात अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे त्याचे भाऊ होते.
मिलिंद हा उच्चशिक्षित होता. त्याने कराटेचं संपूर्ण प्रशिक्षण देखील घेतल्ले होते. लहान पणापासून तो अतिशय हुशार होता. त्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर कोळसा खाणीमध्ये नोकरीही केली होती. त्यानंतर आयटेक युनियनचे काम सुरू केले होते. वणी भागात त्याने कामगार संघटना वाढवल्या. १९८४-८५ या काळात मिलींद तेलतुंबडेने धोपटाडा येथील ओपन कॉस्ट कोलमाईन्स येथे कामाला सुरुवात केली.
यानंतर दोन वर्षांनी पद्मापूर ओपन कॉस्ट कोलमाईन्स येथे काम करत असताना मिलींद तेलतुंबडेचा अॅड. सुजन अब्राहम यांच्याशी संपर्क आला आणि तो नक्षली विचारसरणीकडे आकर्षित झाला. यानंतर मिलींद संयुक्त खदान मजदुर संघ, इंडियन माईन वर्कर्स फेडरेशन या संघटनांच्या माध्यमातून कामगार चळवळींमध्ये सक्रीय झाला.
१९९४ च्या आगोदर मिलींद तेलतुंबडेने नवजीवन भारत सभा या संघटनेचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. नक्षल चळवळीमध्ये सहभाग घेतल्यानंतर चंद्रपूर, वणी, उमरेड, नागपूर येथील कोळसा पट्ट्यांमध्ये मिलींद डीव्हीसीएम म्हणून काम करत होता. पण यानंतर तो अचानक नक्षली चळवळीत सक्रिय झाला.
भाकप माओवादी पक्षाचा महाराष्ट्र सचिव म्हणूनही काम केलं आहे. नक्षली नेत्यांमधल्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी तो एक होता. नक्षल्यांना सोपा रस्ता कोणता आहे आणि नक्षली नेत्यांसाठी सुरक्षित ठिकाण कोणते असू शकते हे शोधण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App