केंद्राने तंबी दिल्यानेच सिरम इन्स्टिट्यूट ऑ फ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लंडनला जाऊन बसले असा अजब दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पुनावाला राज्य सरकारला दीड कोटी कोरोना लसीचे डोस देणार होते. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांना तंबी दिली, असा आरोप त्यांनी केला आहे.Hassan Mushrif’s claim that Adar Poonawala moved to London after the Center stopped him from supplying vaccines to Maharashtra.
प्रतिनिधी
मुंबई: केंद्राने तंबी दिल्यानेच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लंडनला जाऊन बसले असा अजब दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.पुनावाला राज्य सरकारला दीड कोटी कोरोना लसीचे डोस देणार होते. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांना तंबी दिली, असा आरोप त्यांनी केला आहे.
मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली त्यावेळी जूनपासून दीड कोटी लसी द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना केंद्र सरकारने तंबी दिली आणि ते लंडनला जाऊन बसले.
महाराष्ट्रात तयार होणारी कोरोना लसही आपल्याला दिली जात नाही. एकीकडे हे राज्यांना लसीकरण करायला लावतात, दुसरीकडे लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नाही.
मुश्रीफ म्हणाले, जे फ्रंटलाईनला काम करत आहेत त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले पाहिजेत. कोरोना लसींचे सर्व नियंत्रण केंद्राने आपल्या हातात घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, केंद्र सरकार 45 वर्षांवरील ते करणार आणि 18-44 वयोगटातील राज्यांनी करावे असं सांगत आहे हे बरोबर नाही. 18 वर्षावरील वयोगटाला लस देण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन करणे,
संपूर्ण देशासाठी लसीकरणाबाबत एकच धोरण असावे. आम्ही ग्लोबल टेंडर काढलं. कोरोना लसीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 हजार कोटी रुपये एकरकमी देण्याची तयारी केली. तरीही कुठलीही लस उत्पादक कंपनी आमच्यासोबत बोलायला तयार नाही. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी भारतासाठी लस डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मोदी यांनी बायडन यांच्या विरोधात प्रचार केला होता. नमस्ते ट्रम्प म्हणून या देशात ट्रम्प यांना आणले. विरोधात प्रचार केला तरीही भारताला लस दिली, अशी टीकाही मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App