गुरू कमॉडिटीजशी काहीही संबंध नसल्याचा अजित पवारांचा दावा; जरंडेश्वर कारखान्याची विक्री कोर्टाच्या निर्देशानेच

विशेष प्रतिनिधी

पुणे – सातारा जिल्ह्यातील चिमणगावच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्देशानेच कारखान्याची विक्री झालीअसा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. Has no relations with Guru commodities, claims Ajit Pawar

त्याचवेळी आपल्यावरील आरोप खोडून काढत ज्या गुरू कमोडिटीजने करार करून कंपनी चालवण्यास घेतली. त्या गुरू कमोडिटीजसोबत आपला काहीही संबंध नाही असा दावाही अजित पवारांनी केला आहे. गुरू कमॉडिटी ही अजितदादांचे मावसभाऊ राजेंद्र घाडगे यांची आहे. 

याबाबत अजित पवार म्हणाले, की मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारकायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून जरंडेश्वर कारखान्याची विक्री करण्यात आली. हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५  कंपन्यांनी टेंडर भरले होते. पण यामधील सर्वात जास्त टेंडर गुरू कमोडिटी या कंपनीने भरले होते. त्यांनी 65 कोटींचे टेंडर भरले आणि तो कारखाना विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले,” असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

Has no relations with Guru commodities, claims Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात