पुण्यातील हांडेवाडी परिसरत बेपत्ता असलेल्या 20 वर्षीय तरूणाचा खून करून मृतदेह मातीत पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लग्न झाल्यापासून मित्रा सोबत फिरत नाही या कारणास्तव त्याचा मित्रानेच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. Handewadi area residents 20 years youth missing case now converted into Murder case
विशेष प्रतिनिधी
पुणे : हांडेवाडी परिसरत बेपत्ता असलेल्या तरूणाचा खून करून मृतदेह मातीत पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्याचा शोध घेतला जात असताना त्याचा मृतदेह मिळून आला आहे. लग्न झाल्यापासून मित्रा सोबत फिरत नाही या कारणास्तव त्याचा मित्रानेच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
किरण रोहिदास हांडे (वय 20, रा. उरूळी कांचन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक(गुन्हे)सुभाष काळे यांनी सांगितले, किरण याचा प्रेम विवाह झालेला असून, तो हांडेवाडी परिसरात पत्नीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे आई-वडिल पुण्यात राहतात. तो एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याला याच परिसरातील तीन ते चार मित्र आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी तो घरी न आल्याने त्याच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीसांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्याचा शोध घेतला जात होता. तर, त्याचे नातेवाईक देखील त्याचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना हांडेवाडी येथील पाटील व्ह्यु सोसायटीच्या मागील बाजूला मोकळ्या मैदानात दारू पिण्यास बसले होते, अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी येथे येऊन पाहणी केली असता त्यांना मातीत पुरलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती लोणी काळभोर पोलीसांना दिली.
पोलीस निरीक्षक सुभाष काळे व पथकाने याठिकाणी धाव घेतली. त्याचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरला असण्याची शक्यता आहे. संशयितांकडे चौकशी केली जात असून, एक संशयित फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App