वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धासारखी स्थिती इंडो पॅसिफिक विभागात उद्भभवायला नको. यासाठी आपण “क्वाड देशांनी” काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आज केले आहे. India – Australia Summit russia and ukrain war indo pacific
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्कॉट मॉरिसन यांच्यात दुसरी भारत – ऑस्ट्रेलिया व्हर्चुअल समिट झाली. त्यामध्ये स्कॉट मॉरिसन यांनी वरील मत व्यक्त केले आहे. रशिया – युक्रेन युद्धामुळे संपूर्ण युरोप मध्ये आर्थिक संकट आले आहे. मानवी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम जगाला दीर्घकाळ भोगावा लागणार आहे. अशी स्थिती इंडो पॅसिफिक विभागात येऊ नये याची आपण सर्व देशांनी काळजी घेतली पाहिजे. विशेषतः अमेरिका भारत जपान आणि ऑस्ट्रेलिया या “क्वाड देशांनी” आपली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत केली पाहिजे, असे प्रतिपादन स्कॉट मॉरिसन यांनी केले आहे.
My remarks at the India-Australia virtual summit with PM @ScottMorrisonMP https://t.co/TLBmappqgI — Narendra Modi (@narendramodi) March 21, 2022
My remarks at the India-Australia virtual summit with PM @ScottMorrisonMP https://t.co/TLBmappqgI
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2022
रशिया – युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर “क्वाड देशांच्या” प्रमुखांनी कॉन्फरन्स कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क साधला होता. त्या वेळी व्यक्त केलेली व्यक्त केलेला निर्धार आजही कायम असल्याचे स्कॉट मॉरिसन म्हणाले.
– 1500 कोटींची गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्मार्ट मारायचं स्कॉट मॉरिसन यांच्या वर्च्युअल समितीमध्ये सुमारे 1500 कोटी रुपयांच्या ऑस्ट्रेलियन गुंतवणूकीवर करार होणार आहेत. या करारात प्रामुख्याने भारतात पायाभूत सुविधांमध्ये ऑस्ट्रेलियन कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यावर समिट पूर्वी ऑस्ट्रेलियाने भारताकडे त्यांच्या देशात स्मगलिंग द्वारे पोहोचलेल्या 29 पुरातन मूर्ती भारताला परत केल्या आहेत. त्यांची पाहणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App