घराशेजारील अल्पवयीन मुलीस धमकावून बलात्कार

एका १५ वर्षीय मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुलीस तुझ्या कुटुंबियांना जीवे ठार मारेन अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


विशेष प्रतिनिधी 

पुणे -पुणे शहरातील नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुलीस तुझ्या कुटुंबियांना जीवे ठार मारेन अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामेश्वर हरिश्चंद्र हंगरगे (वय-३०) या आराेपीस पाेलीसांनी अटक केली आहे. 15 years girl raped by Neighbour ३० yrs youth in Narhe area

याबाबत आराेपी विराेधात पिडित मुलीने सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पिडित मुलगी नऱ्हे परिसरातील एका साेसायटीत कुटुंबा समवेत रहाण्यास आहे. नववी इयत्तेत ती शिक्षण घेत असून तिची शाळा सध्या ऑनलाइन सुरु असल्याने वडीलांनी काही दिवसांपूर्वी तिला एक माेबाईल घेऊन दिला हाेता. घराशेजारी राहणाऱ्या रामेश्वर हंगरगे या आराेपीने तिला सदर माेबाईलवरुन संर्पक ठेवत तिच्याशी संवाद वाढवत तिचा विश्वास निर्माण केला.

मुलीचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर गेले की, आराेपी काहीतरी कारण काढून मुलीच्या घरी जबरदस्तीने येऊ लागला. सप्टेंबर २०२१ मध्ये त्याने तिच्यावर जबरदस्तीने घरात शिरुन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर संबंधित प्रकार काेणला सांगू नकाे नाहीतर तुझ्या आई, वडील, भावाला ठार मारुन टाकेन अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत तिच्याशी शारिरिक संबंध करु लागला.

अखेर या त्रासाला कंटाळून मुलीने याबाबतची माहिती पालकांना दिली. त्यानंतर याबाबत सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात पिडित मुलीने तक्रार दिल्यानंतर, पाेलीसांनी आराेपीस अटक केली आहे. याबाबत सिंहगड राेड पाेलीस पुढील तपास करत आहे.

15 years girl raped by Neighbour ३० yrs youth in Narhe area

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात