प्रतिनिधी
मुंबई : संपकरी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते विविध आरोपांखाली महाराष्ट्राच्या विविध कारागृहांमध्ये जाऊन आज 18 दिवसानंतर आज बाहेर आहेत. सदावर्ते यांना जामीन मिळताच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यादेखील अज्ञातवासातून बाहेर आल्या आहेत.Gunaratna Sadavarte out of jail, while his wife Jayashree Patil out of “anonymity”
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वकील गुणरत्न सदावर्ते अडचणीत आले, जेव्हा कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पल फेक हल्ला केली तेव्हा सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची १८ दिवसांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी सदावर्ते यांनी ‘आपण कारागृहातील १८ दिवस केवळ पाण्यावर राहिलो, यापुढे आपली कष्टकऱ्यांसाठीची लढाई चालूच राहणार आहे’, असे सांगत सदावर्ते यांनी स्वतःचा कैदी क्रमांक ५६८१ हाही माध्यमांना सांगून टाकला.
कामगारांचा लढा सुरूच राहणार
एसटी कामगार कुणाच्या सांगण्यावरून कामावर गेले नाही, तर गुणरत्न सदावर्ते याने सांगितले म्हणून ते कामावर हजर राहिले आहेत. हा लढा सुरूच राहणार आहे, पुढचा लढा एसटीच्या बँकेचा असणार आहे. एसटीचे कामगार 6 महिने उपाशी राहिले म्हणून त्यांना कामावर जाण्यास सांगितले, असेही सदावर्ते म्हणाले.
मला अटक केल्यावर माझी चौकशी कोणत्या विषयावर होत होती, हेच कळत नव्हते. चौकशी एसटीच्या आंदोलनाची नव्हती, तर दुसऱ्याच अ आणि ब विषयावर झाली, असे सांगत कोणत्या दुसऱ्या विषयावर चौकशी झाली त्यांचा उल्लेख करण्याचे सदावर्ते यांनी टाळले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App