विशेष प्रतिनिधी
मुंबई : दीर्घ काळ रखडलेली राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून बीडचे पालक मंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. पुण्यासह ते आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहे, मात्र बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत.
इतर जिल्हा पालकमंत्री पुढीलप्रमाणे :
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे ठाणे – एकनाथ शिंदे पुणे – अजित पवार बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे गडचिरोली – देवेंद्र फडणवीस नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे ठाणे – एकनाथ शिंदे पुणे – अजित पवार बीड – अजित पवार अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील सातारा -शंभुराजे देसाई छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट जळगाव – गुलाबराव पाटील यवतमाळ – संजय राठोड कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ अकोला – आकाश फुंडकर भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मंकरंद जाधव चंद्रपूर – अशोक ऊईके धाराशीव – प्रताप सरनाईक धुळे – जयकुमार रावल गोंदिया – बाबासाहेब पाटील हिंगोली – नरहरी झिरवळ लातूर – शिवेंद्रसिंग भोसले मुंबई शहर – एकनाथ शिंदे मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा/ नांदेड – अतुल सावे नंदुरबार – मानिकराव कोकाटे नाशिक – गिरीश महाजन पालघर – गणेश नाईक परभणी – मेघना बोर्डीकर रायगड – अदिती तटकरे सिंधुदुर्ग- नितेश राणे रत्नागिरी – उदय सामंत सोलापूर – जयकुमार गोरे वर्धा – पंकज भोयर जालना – पंकजा मुंडे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App