प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे हे घटनापीठापुढे युक्तीवाद करताना नेमके मुद्दे उपस्थित केले आहेत. Government collapsed not because of 16 MLAs, but because of Uddhav Thackeray
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना 30 जून पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत होती. मात्र बहुमत सिद्ध करण्याऐवजी त्यांनी मुदतीपूर्वीच राजीनामा का दिला?? महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारला महाविकास आघाडीच्या 173 आमदारांचा पाठिंबा होता. मग सरकार विधानसभेत बहुमताच्या शक्तिपरीक्षेला सामोरे का गेले नाही?? त्यामुळे 16 आमदारांमुळे सरकार पडले, हा दावा चुकीचा आहे. उद्धव ठाकरे यांनी मुदतीपूर्वी राजीनामा दिल्यामुळे सरकार कोसळले. सरकार जाण्यास मुदतीपूर्वी राजीनामा देणारे उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला आहे.
साळवे यांचा युक्तीवाद काय?
उद्धव ठाकरेंना 30 जूनपर्यंत बहूमत सिद्ध करण्याची मुदत होती. त्यांनी वेळेच्या आधीच राजीनामा का दिला? बहुमत सिद्ध न करता ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यावेळी मविआजवळ 288 पैकी 173 आमदार होते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्याने सरकार पडले. त्यामुळे बंडखोर 16 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला असता की नाही? हा मुद्दाच निरर्थक आहे. बंडखोर आमदारांमुळे सरकार पडलेले नाही, असा युक्तिवाद साळवे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App