प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा शपथविधी महाराष्ट्रातील राजकारणातला सर्वात मोठा धक्का होता. आता याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या संमतीनेच हा शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत केला. Prakash Ambedkar targets sharad Pawar over his double standard politics
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या राजकारणात जोरदार टोला हाणला आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
फडणवीसांच्या या गौप्यस्फोटाबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, फडणवीसांनी जे सांगितले तीच भूमिका अजित पवारांनीही मांडली होती. मला एकट्याला कशाला दोष देतायत? माझ्या पक्षाचा निर्णय होता. त्याच्यामुळे आम्ही जे म्हणतं होतो की, लग्न लावायचं गंगूशी आणि संसार करायचा सावत्रीशी, हे खरं ठरलं आहे,’ असा टोला प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
फडणवीस काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करत होते, तेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवंय. त्यानंतर शरद पवारांसोबत चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिले आहे.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App