बघा कुठल्या.भारतीय उद्योग क्षेत्राचा केला सन्मान!
विशेष प्रतिनिधी
पुणे : सगळा देश आज 77 वा स्वातंत्र्याच्या दिन उत्साहात साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत देशभरात विविध कार्यक्रम राबवत भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. 1947 ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीला झुगारू , अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रांतिवीरांच्या बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारताने विविध क्षेत्रांमध्ये विकासाचा एक पाऊल पुढे टाकलं. विज्ञान तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान, कापड उद्योग या सगळ्याच उद्योगांमध्ये भरारी घेत 2023 चा नवीन भारत आज जगासमोर उभा आहे. Google celebrate the 77 th Independence Day with Doodle !
या वेळच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ” राष्ट्र प्रथम आणि नेहमीच प्रथम” ही आहे. या थीमचा उद्देश हा राष्ट्राला भारतीयांची एकात्मता साधतच राष्ट्राला सगळ्यात पुढे ठेवून हा आहे.आजच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत , गुगलने देशाच्या समृद्ध विविध राज्यांची कपडा उद्योगाची यशोगाथा सांगणार डूडलं बनवत भारतीय वस्त्रोद्योगाचा सन्मान केला आहे .गुगलने बनवलेल्या डूडलमध्ये भारतीय राज्यांमधील पारंपारिक प्रकारच्या अनेक कापडांचा, प्रिंटचा,आणि हॅण्डलूम च्या माध्यमातून भारतीय टेक्स्टाईल उद्योगाला जगासमोर आणलं आहे.
हे डूडल नवी दिल्लीतील कलाकार नम्रता कुमार हिने चित्रीतं केलं असून, गुगलने ते आजच्या ऐतिहासिक दिवशी प्रसिद्ध केलं आहे. गुगलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या डूडलला भारतीय महिला वर्गाकडून विशेष प्रेम मिळताना दिसतय.
भारतीय एकात्मता भारतीय परंपरा आणि भारतीय समृद्ध वस्त्रोद्योग एकत्र दाखवत सुंदर सुबक आणि कलरफुल असं डूडल हे आजच्या अनेकांच्या सोशल मीडियाचं स्टेटस ठरतंय.भारताच्या प्राचीन अशा समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेला साजेसं असे डूडल असून, कलाकार नम्रता कुमार हीचही अनेकांनी कौतुक केलंय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App