हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टूच्या भावाने फडकवला तिरंगा!!; दिला शांती – विकासाचा पैगाम!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये अक्षरशः अक्रित घडले. देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे 15 ऑगस्ट सेलिब्रेशन जबरदस्त झाले. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवल्यानंतर खूप मोठे बदल घडल्याचे चिन्ह आज दिसून आले. यामध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने तिरंगा फडकवला. जम्मू काश्मीरचा विकास होतो आहे. इथे शांतता नांदते आहे, अशा शब्दांत रईस मट्टू याने समाधान व्यक्त केले. Hizbul terrorist’s brother waves tricolor in sopore

जम्मू काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह 13 ऑगस्ट पासूनच दिसून आला. ज्या काश्मीर खोऱ्यातून कायम दहशतवादी चकमकीच्या भारतीय फौजांवर दगडफेकीच्या बातम्या यायच्या, त्या काश्मीर खोऱ्यातल्या वेगवेगळ्या शहरांमधून तिरंगा रॅली निघाल्याच्या बातम्या आल्या. लाखो काश्मिरी तरुण-तरुणींनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.

जम्मू कश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तिथल्या जनतेला विविध सरकारी योजनांचा थेट लाभ मिळाला. या योजनांचा फायदा तळागाळापर्यंत पोहोचला. त्याचेच प्रतिबिंब आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साही सेलिब्रेशन मध्ये दिसून आले.

आज 15 ऑगस्टच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी पातळीवर उत्सव साजरा झालाच, पण सर्वसामान्य जनतेमध्ये जो उत्साह दिसून आला तो सर्वसाधारणपणे ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये दिसून येतो, असे महत्त्वाचे निरीक्षण आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी नोंदविले आणि हेच अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण आहे.

आत्तापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये सरकारी पातळीवरचे स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन आत्तापर्यंत प्रचंड फौज फाट्यात बंदोबस्तात करावे लागायचे. 2023 चा स्वातंत्र्य दिन बंदोबस्तात तर झालाच, पण त्या पलीकडे प्रचंड उत्साह या वर्णनाला अनुकूल ठरला. लाल चौकामध्ये कायमचा तिरंगा फडकला. जम्मू-काश्मीरमधील छोट्या-मोठ्या शहरांमधून सरकारी खासगी इमारतींवर रोषणाई करण्यात आली.

– रईस मट्टूने सोपोर मध्ये झेंडा फडकवला

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मुट्टू याचा भाऊ रईस मट्टू याचे सोपोर मध्ये दुकान आहे. तिथे त्याने 14 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवला जम्मू-काश्मीरमध्ये विकास होतो आहे इथे आता शांतता नांदत आहे. काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या आसपास दोन-तीन दिवस दुकान बंद करावे लागायचे. कारण वातावरण बिलकुल चांगले नव्हते. आता त्यात खूप मोठा फरक पडला आहे. विकास तर होतोच आहे, पण शांतताही नांदत आहे. इथे कोणाला निर्दोष व्यक्तीला पकडले जात नाही. फक्त दोषी व्यक्तींनाच पकडून सजा दिली जाते, अशा शब्दांत रेस मट्टू यांनी रईस मट्टू याने विश्वास व्यक्त केला.

त्याच वेळी जावेद मट्टू याचे काय झाले? हे आम्हाला माहिती नाही. 2009 मध्ये तो आमच्यापासून दूर झाल्यानंतर त्याची कोणतीही खबरबात आम्हाला नाही. तोजिवंत आहे का नाही आम्हाला माहिती नाही. जिवंत असेल, तर त्याने परत यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुरू झालेल्या शांती यात्रेत सामील व्हावे, असा पैगाम रईस मट्टू याने दिला.

पाकिस्तानचा भिकारी देश बनल्याने जम्मू-काश्मीरच्या जनतेला तो काही देऊ शकत नाही अशा शब्दात रईस मट्टू याने पाकिस्तानचे देखील वाभाडे काढले.

भारताच्या अन्य राज्यांमध्ये स्वातंत्र्य दिनाचा जो उत्साह दिसून येतो, तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त उत्साह जम्मू-काश्मीरमध्ये दिसून आला. हे 2023 च्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले.

Hizbul terrorist’s brother waves tricolor in sopore

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात