प्रतिनिधी
बुलढाणा : बुलढाण्यातील एका गणेश मंडळाची मुर्ती कोट्यवधी रुपयांच्या सोन्या आणि चांदीच्या आभूषणांनी सजली आहे. विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती, अशी त्याची ख्याती आहे. Gold and silver ornaments worth crores of rupees on Ganesh idol in Buldhana; Rich Ganpati of Vidarbha
खामगाव तालुक्यातील दालफैल भागातील राणा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यानी सोने आणि चांदीने नटलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून तो ओळखला जातो.
गेल्या २५ वर्षापासून या गणेशमुर्तीवर दरवर्षी सोने आणि चांदीच्या अभूषणात वाढ करण्यात येत आहे. यंदा कोरोनामुळेफरशी भागातील मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने गणरायाची पूजा केली जात आहे.
या गणेश मूर्तीवर तब्बल ७० किलो चांदी आणि दीड किलो सोन्याची आभूषणे आहेत. ज्याचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.त्यामुळेच विदर्भातील श्रीमंत गणपती पैकी एक म्हणून या बाप्पाला मान आहे. नवसाला पावणारा असा हा बाप्पा भक्तांना भरभरून आशीर्वाद देत असल्याचे बोलले जाते.
लखपती गणपती अशीही ओळख
विदर्भात मानाचा लखपती गणपती म्हणूनही या बाप्पाची ओळख आहे. दूरवरून भक्तगण बाराही महिने दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, कोरोनामुळे गणेश उत्सव शांततेत आणि अत्यंत सध्या पद्धतीने साजरा होत आहे. कोरोना महामारीचं संकट टळू दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी गणेश भक्त करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App