Gokul Milk Price : राज्यातील प्रसिद्ध गोकुळ दुधाच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा दूधसंघाने केली आहे. गोकुळचे नवे दर 11 जुलैपासून लागू होणार आहेत. दूध दर वाढीमुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु याचबरोबर सर्वसामान्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. Gokul Milk Price Hiked by 2 rupees From 11th July
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्यातील प्रसिद्ध गोकुळ दुधाच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा दूधसंघाने केली आहे. गोकुळचे नवे दर 11 जुलैपासून लागू होणार आहेत. दूध दर वाढीमुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु याचबरोबर सर्वसामान्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीला दोन महिने उलटल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादकांकडून म्हशीचे दूध 2 रुपये, तर गाईचे दूध 1 रुपयांनी वाढ करून खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली.
प्रामुख्याने मुंबई, पुणे भागात गोकुळच्या दूध दर वाढीचा फटका बसेल. 11 जुलैपासून दुधासाठी आता 2 रुपये जास्त मोजावे लागतील. यापूर्वी देशातील प्रसिद्ध अमूल दुधाच्या किमतीतही 2 रुपयांनी वाढ झालेली आहे.
पूर्वी महाडिक गटाकडे असलेला गोकुळ दूध संघ, तीन दशकांनंतर सतेज पाटील व विश्वास पाटील यांच्या गटाकडे आला आहे. विश्वास पाटील हे गोकुळचे अध्यक्ष आहेत.
Gokul Milk Price Hiked by 2 rupees From 11th July
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App