Goa Election : पर्रीकरांच्या मुलाच्या तिकिटाचा मुद्दा चर्चेत, उत्पल पर्रीकरांच्या पणजीत घरोघरी भेटी सुरू, अपक्ष लढणार की आप-शिवसेनेत जाणार?

Goa Election Parrikar's son discusses ticket issue, Utpal Parrikars house-to-house visits in Panaji

Goa Election : गोव्याच्या राजकीय लढाईत माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल हे भाजपसाठी नवे आव्हान बनले आहेत. गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात राजकीय वाद सुरू असल्याचे चित्र सध्या माध्यमांतून येत आहे. उत्पल यांना भाजपकडून अद्याप तिकीट मिळालेले नाही आणि त्यांना पणजीतून निवडणूक लढवायची आहे. Goa Election Parrikar’s son discusses ticket issue, Utpal Parrikars house-to-house visits in Panaji


प्रतिनिधी

पणजी : गोव्याच्या राजकीय लढाईत माजी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल हे भाजपसाठी नवे आव्हान बनले आहेत. गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात राजकीय वाद सुरू असल्याचे चित्र सध्या माध्यमांतून येत आहे. उत्पल यांना भाजपकडून अद्याप तिकीट मिळालेले नाही आणि त्यांना पणजीतून निवडणूक लढवायची आहे.

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून काही तिकिटासाठी पात्र ठरवता येणार नाही. अशा स्थितीत आता भाजप उत्पल यांना तिकीट देणार की अन्य राजकीय पक्षांचा ते पाठिंबा घेतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पणजीची जागा चर्चेत आहे. शनिवारी पणजीमध्ये उत्पल घरोघरी जाऊन लोकांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसले. ते या जागेवरून तिकिटाची मागणी करत आहेत, तर गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस मात्र या बाजूने नाहीत. केवळ मनोहर पर्रीकर किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा असल्याने त्यांना भाजपच्या तिकिटासाठी पात्र ठरवता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या वक्तव्यावर उत्पल यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली.

गोव्यात जे राजकारण सुरू आहे ते मी सहन करू शकत नाही, असे उत्पल म्हणाले होते. हे मला मान्य नाही. उत्पल एका मुलाखतीत म्हणाले की, फडणवीस म्हणतात की जिंकण्याची क्षमता हाच निकष आहे? चारित्र्याने काहीच फरक पडत नाही? आणि गुन्हेगारी इतिहास असलेल्या व्यक्तीला तुम्ही तिकीट देणार आहात, तर मग आम्ही घरी शांत बसावे?” भाजपने या मतदारसंघासाठी विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना पक्षाचे तिकीट दिल्यास ते गप्प बसणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

केजरीवालांकडून उत्पल यांना ‘आप’मध्ये येण्याचे निमंत्रण

यावेळी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या प्रवेशाने निवडणुकीतील ट्विस्ट येत आहे. राजकीय मूड ओळखून अरविंद केजरीवाल यांनी उत्पल यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्यास ते अपक्षही उभे राहू शकतात.

उत्पल काँग्रेसमध्ये जाणार?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्पल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. यानंतर उत्पल काँग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा होती. आतापर्यंत असे काहीही दिसत नसले तरी उत्पल यांनी ज्या प्रकारे पक्षाविरोधात आघाडी उघडली आहे, त्याचा फटका पक्षाला निवडणुकीत सहन करावा लागू शकतो. यापूर्वी जुलै 2019 मध्ये गोव्यात राजकीय घडामोडी घडल्या तेव्हा उत्पल म्हणाले होते की, मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या राजकारणात जो विश्वास निर्माण केला होता तो संपला आहे. त्यावेळी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते.

गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान

गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी पणजी मतदारसंघातून पक्षाचे विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांचे नाव तिकिटासाठी पुढे केले जात आहे. उत्पल पर्रीकर त्यांना विरोध करत आहेत. मनोहर पर्रीकर यांचे मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात 2019 मध्ये निधन झाले. त्यांच्यानंतर प्रमोद सावत यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले.

Goa Election Parrikar’s son discusses ticket issue, Utpal Parrikars house-to-house visits in Panaji

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात