गणपतीसाठी कोकणात जा मोफत; 6 “मोदी एक्सप्रेस”सह 250 बसचा प्रवास करा फुकट!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय अस्वस्थता असताना गणेशोत्सव जवळ आला आहे. या गणेशोत्सवात मुंबईतल्या चाकरमानांना कोकणात पोहोचवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. यासाठी मुंबईतून 6 रेल्वे गाड्या आणि तब्बल 250 बस सोडण्यात येणार असून त्यांचा सर्व प्रवास खर्च मुंबई भाजपा उचलणार आहे. यातून कोकण आणि मुंबईतली कोकणी मते वळवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी खेळली आहे.  Go to Konkan for Ganpati for free modi express and busses

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशा तीन दिवशी भाजपा मुंबईतून 6 रेल्वे गाड्या आणि 250 बसेस सोडणार आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांना आता मोफत करता येणार आहे. यासोबतच मुंबई भाजप “मोदी एक्स्प्रेस” ही विशेष गाडी देखील सोडणार आहे. 28 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर सावंतवाडी एक्सप्रेस सुटणार आहे. ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसचा खर्च मुंबई भाजप उचलला जाणार आहे.

226 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन

यावर्षी मध्य रेल्वेने गणपती विशेष गाड्यांच्या 226 फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी फक्त 2 रेल्वेगाड्यांमध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि द्वितीय श्रेणी वातानूकूलित डबे आहेत. तर, काही रेल्वेगाड्या अनारक्षित आणि काही विनावातानुकूलित डबे आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक अखरे सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 10 सप्टेंबरपासून कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन रस्ता सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. पोलादपूर येथील भोगाव पासून सुरु होणारा कशेडी बोगदा खेड मधील कशेडी इथं बाहेर पडणार आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. नऊ किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचणार आहे. सिंगल लेन सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यना दिलासा मिळालाय.बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची टोल माफी

यंदा गणपतीला कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची टोल माफी करण्यात येणारेय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे आता 600 ते 700 रुपये वाचणार आहेत. मात्र, यासाठी पास काढावा लागणारेय. मुंबई शहरासह ठाणे, पालघर इथल्या नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशन आणि आरटीओकडून पास घ्यावे लागणार आहे.

Go to Konkan for Ganpati for free modi express and busses

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात