प्रतिनिधी
मुंबई : कोरोनानंतर गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या ठाणेकर गणेशभक्तांसाठी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीला धावून आली आहे.
मनसेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातून गणेशोत्सवाकरता कोकणात १३६ बसेस सोडण्यात येणार आहेत. नागरिकांना दिलेल्या शब्दानुसार या सर्व शिवशाही AC बसेस यंदा कोकणात रवाना करण्यात येणार आहे. ते पुढे असेही म्हणाले की, कोकणातील रस्ते आणि खड्ड्यांची परिस्थिती पाहता लोकांचा प्रवास हा त्रासदायक झाला होता. त्यामुळे २४ तासांनंतर सर्व बसेस कोकणात पोहोचत होत्या. त्यामुळे गेल्या वर्षीच मनसेने निश्चय केला होता की AC बसने नागरिकांना कोकणात नेणार आणि हा शब्द मनसेने पाळला आहे.
मनसेकडून ठाणे जिल्ह्यात या सर्व मोफत १३६ शिवशाही एसी बसेस भरून एकूण ६ हजार ७०० लोक गणेशोत्सवासाठी कोकणात यंदा जाणार आहेत. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता पहिली बसेसची खेप निघणार आहे, तर ३० ऑगस्टपर्यंत या फ्री बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेस मालवण, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळून, गुहागर, रत्नागिरी, दापोली, खेड, मंडणगड, महाड, पोलादपूर आणि पाली येथे जाणार आहे.
यासह मुंबई-पुण्यातून कोकणात जाण्याऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर खास चाकरमान्यांच्या सोयीकरिता २७२ अतिरिक्त गाड्या धावणार आहेत.
२७२ अतिरिक्त गाड्या
गणपतीला आता फक्त काही दिवस बाकी आहेत त्यामुळे कोकण रेल्वेने २७२ अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. शिवाय ३२ नियमित मेमू ट्रेन चिपळूणपर्यंत धावणार आहे. जादा गाड्यांमध्ये आणखी वाढ होणार आहे. बहुतांश जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून येत्या २७ ऑगस्टपासून कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App