‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत लाभ देण्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले – मुख्यमंत्री शिंदे


गडचिरोलीतील पोलीस दलाने जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपविला,  असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले  आहे.

विशेष प्रतिनिधी

गडचिरोली :  ‘शासन आपल्या दारी’ या महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत लोकाभिमुख अभियानाचा पुढचा टप्पा आज गडचिरोली जिल्ह्यात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  Gadchiroli district has Break all records in providing benefits under Shasan Aaya Dari’ initiative  Chief Minister Shinde

याच कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे शासकीय वसतिगृह, निवासी शाळा आणि आरोग्य विभागाच्या पीडियाट्रिक मॉड्युलर आयसीयूचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रिमोट दाबून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. तसेच ‘शासन आपल्या दारी’ या कॉफी टेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन देखील करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत लाभ देण्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख असून जवळपास ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला आहे. राज्यातील युती सरकारच्या वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम शासन आपल्या दारी अंतर्गत गडचिरोलीमध्ये घेण्यात आला. सर्वसामान्यांसाठी आहे लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, यासाठी शासनाने हा उपक्रम राबविला आहे.

महिला भगिनींसाठी अनेक योजना हाती घेतल्या असून राज्यातील बचत गट आम्ही सक्षम करीत आहोत. त्यासाठी महिला बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रैंडिंग मार्केटिंग करण्यावर जोर देण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरजागडला मान्यता देण्यात आली. लॉयड स्टीलचा दुसरा प्रकल्प जिल्ह्यात लवकरच सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गडचिरोलीतील पोलीस दलाने जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपविला आहे. तसेच नक्षलमुक्त आणि मुख्य प्रवाहातील प्रमुख जिल्हा म्हणून गडचिरोली नावारूपास येत आहे. तसेच, राज्यात अजित पवार यांच्या सोबत येण्याने ट्रिपल इंजिनचे हे सरकार अस्तित्वात आले आहे. राज्याला ते नक्की प्रगतीपथावर नेणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

 Gadchiroli district has Break all records in providing benefits under Shasan Aaya Dari initiative  Chief Minister Shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात