राज्यातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी चाचण्या कमी करण्याचा फंडा वापरण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे. त्यामुळे केवल लक्षणे असणारेच आता कोरोना चाचणी करू शकणार आहेत.Fund to reduce the number of patients by reducing tests
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी चाचण्या कमी करण्याचा फंडा वापरण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे. त्यामुळे केवल लक्षणे असणारेच आता कोरोना चाचणी करू शकणार आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येला अटकाव करण्यासाठी आता होम क्वारंटाईनची पध्दत बंद करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्येच राहावे लागणार आहे.
त्याचबरोबर केवळ लक्षणे असणाऱ्यांच्याच कोरोना चाचण्या होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.टोपे म्हणाले की, सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे,
त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यातील पहिली म्हणजे, होम आयसोलेशन १०० टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत.
यामध्ये पुण्यासह पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि धोका असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.
ठिकठिकाणी कोरोना चाचण्या केल्याने पॉझिटिव्हीटी रेटवर परिणाम होतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.राज्यात १ जूनपासून चार टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे का?
याबाबत विचारण्यात आलं असता राजेश टोपे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत, अशी माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App