विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचा “सिलेक्टिव्ह” इतिहास समोर आणला आहे. एकेकाळच्या राजकीय वैऱ्याला श्रद्धांजली वाहताना शरद पवारांनी बाळासाहेबांची व्यंगचित्रकला आणि मराठी माणसाचा स्वाभिमान एवढे दोनच उल्लेख करून बाळासाहेबांचे प्रमुख तत्व हिंदुत्व हेच आपल्या ट्विटमधून गायब केले आहे.From Pawar’s tweet, Balasaheb’s Hindutva will be damaged; Only satire and self respect of Marathi was mentioned!!
बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते होते. महाराष्ट्रासह देशात हिंदुत्वाचा अंगार पेटवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. बाबरी मशिदीच्या जागी भव्य राम मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. त्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये आवर्जून केला. परंतु शरद पवारांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाचा आपल्या ट्विटमध्ये बिलकुलच उल्लेख केलेला नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्व त्यांच्यापासून वगळून टाकले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख… pic.twitter.com/Qi2RjplItT — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 23, 2024
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख… pic.twitter.com/Qi2RjplItT
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 23, 2024
शरद पवारांचे ट्विट असे :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
या ट्विट मधून पवारांनी बाळासाहेबांचा फक्त “सिलेक्टिव्ह” इतिहास समोर आणला आहे. कारण बाळासाहेबांनी ज्यावेळी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती, त्यावेळी पवार महाराष्ट्रात सत्ताधारी होते पवारांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसवर बाळासाहेबांनी हिंदुत्ववादी भूमिकेच्या आधारेच मात केली होती. पवारांच्या पक्षांचा पराभव केला होता. हा इतिहास पवारांना डांचत असल्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादाचा इतिहास लपवण्याचा पवारांनी आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रयत्न केला. फक्त त्यांच्यातल्या व्यंगचित्रकाराला आणि मराठी माणसाच्या मुद्द्याला उचलून धरत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App