ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून लवकरच मोफत देवदर्शन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिंदे – फडणवीस मोठा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ७५ वर्षावरील नागरिकांना राज्य सरकारने एसटीतून मोफत प्रवाससेवा देण्यास सुरू केली. त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना सरकार राज्यभरात मोफत देवदर्शनाची सुविधा सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता यावे यासाठी या मेगाप्लॅन आखला जात आहे. Free Devdarshan for senior citizens from ST soon; Information about Chief Minister Eknath Shinde

राज्यात १ कोटींच्या जवळपास ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. या नागरिकांना देवदर्शन करून आणण्यासाठी तब्बल 2000 गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

या नवनव्या योजनांचा एसटी महामंडळाला निश्चितच फायदा होणार आहे. सध्या महाराष्ट्रात ६५ वर्षावरील नागरिकांना तिकीच दराक ५० % सवलत मिळते तर ७५ वर्षीय नागरिकांना मोफत प्रवास करता येतो. मात्र आता मोफत देवदर्शनाच्या योजनेत सर्वच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.

मोफत देवदर्शन योजना कशी असेल?

  • मोफत देवदर्शन या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना अष्टविनायक, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर, शिर्डी, शेगाव, ज्योतिबा या देवस्थानांना जाता येणार आहे.
  • केवळ शनिवारी – रविवारी ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येईल.
  • स्थानिक डेपोमधून प्रवाशांना या सहलीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
  • राहण्या – खाण्याची व्यवस्था संबंधित देवस्थानामार्फत करण्यात येईल. अन्यथा प्रवाशांना स्वत:चा खर्च करावा लागणार आहे. धर्मशाळा, राखीव निवासात खोल्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल.

Free Devdarshan for senior citizens from ST soon; Information about Chief Minister Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात