
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड आणखी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर शरीरसुख मागितल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब पोलीसांनी नोंदवून घेतला आहे. आता संजय राठोड यांचा सुद्धा जबाब नोंदवला जाणार आहे.Former Forest Minister Sanjay Rathore in trouble, police recorded the reply of a woman who was alleging that she had asked for sexual favour
एका महिलेनं संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात पोस्टाने पाठवली होती. या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली होती. त्यात ज्या महिलेने तक्रार दिली त्या महिलेचे सुद्धा जबाब घाटंजी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. बुधवारी संजय राठोड याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
एसआयटी समिती पीडित महिला आणि संजय राठोड यांचा जबाब तपासून अहवाल देणार आहे. त्यानंतर माध्यमांना सदर प्रकरणातील वस्तुस्थिती सांगितली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
या महिलेच्या पत्राची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तत्काळ विशेष चौकशी पथकाचे गठन केले. शुक्रवारी एसआयटीने बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांची प्रकृती बरोबर नाही. माझीही मनस्थिती बरोबर नाही, असे निवेदन पोलिसांना दिले होते. अखेर १४ ऑगस्ट रोजी जबाब देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या महिलेची बंद दाराआड दोन चौकशी करण्यात आली.
पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केली, असा गंभीर आरोप या महिलेने घाटंजी पोलीस ठाण्यात पाठविलेल्या तक्रारीत केला आहे. ही तक्रार घाटनजी पोलिसांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाला पाठवून या बाबत कारवाई संदर्भात मार्गदर्शन मागण्यात आल्याची माहिती पोलीसानी दिली.
माजी मंत्री संजय राठोड यांच्या संस्थेवर तीन शिक्षक कार्यरत होते. दरम्यान गैरवर्तवणुकीमुळे त्या शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर एका शिक्षणाच्या पत्नीने, पतीला पूर्ववत कामावर घेण्यात यावे यासाठी धमकी दिली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर मोबाईलवर मेसेज ही पाठवले. मात्र तिच्या पतीला कामावर घेतले नाही. या प्रकरणात या महिलेने घाटंजी पोलिसांना पोस्टाद्वारे तक्रार पाठवून संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला.
Former Forest Minister Sanjay Rathore in trouble, police recorded the reply of a woman who was alleging that she had asked for sexual favour
महत्वाच्या बातम्या
- रशियाला आला तालीबानचा पुळका, तालिबानच्या नियंत्रणात काबुलची स्थिती चांगली असल्याचे दिले सर्टिफिकेट
- ट्विटरने झटका दिल्यावर आता फेसबुकचीही राहूल गांधींना नोटीस, इन्स्टाग्रामवरील ती पोस्ट त्वरित हटविण्याचे आदेश
- आंध्र प्रदेश सरकारची लपवालपवी, आता सरकारी आदेश, अध्यादेश वेबसाईटवर टाकणार नाही
- डाव्या आघाडीच्या राजकारणामुळे केरळमध्ये कोरोना वाढतोय, महिलांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचे केंद्र बनतोय, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल