विशेष प्रतिनिधी
मुंबई: तृतीयपंथीयांना कोरोनाविरोधी लस देण्यासाठी एका अल्पवयीन विद्यार्थिनीने चक्क २ लाख रुपयांचा निधी संकलित केला. तसेच लसीकरण शिबिर आयोजित करून ते यशस्वी करून दाखविले आहे.For Transgender community a vaccination Drive ; Small girl from Mumbai collected Rs 2 lakh fund
सिया सहगल ( वय १६ ), असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती ताडदेव येथील हिल स्प्रिंग्ज इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. सिया सहगल ही तृतीयपंथीयांच्या सामूहिक लसीकरणासाठी कोविशिल्डच्या कुपी खरेदी आणि दान करणारी महाराष्ट्र जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटी (एमडीएसीएस) मध्ये नोंदविलेली प्रथम किशोरी दाता ठरली आहे.
तिने जमा केलेल्या दोन लाख रुपयातून शनिवारी, १२० सदस्यांना विनामूल्य लसीचा पहिला डोस देण्यात आला. जनजागृतीचा अभाव आणि समाजापासून दुरावलेले बरेच लोक लसीकरणापासून वंचित आहेत. ही बाब ओळखून सहगलने त्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला.
“मला समुदायाची मदत करायची असल्याने मी तृतीयपंथी समुदायाच्या प्रमुखांशी संपर्क साधला आणि त्यांना झूम व्हिडिओ कॉलद्वारे लसीकरणाचे महत्व पटवून दिले. जेव्हा लस घेण्याचे मान्य केले, तेव्हा मी इनहार्मनी, त्रिवेणी समाज विकास केंद्र आणि आय-टेक अशा विविध संस्थांशी संपर्क साधला.
त्यांनीज मला लस कुपी खरेदी करण्यासाठी आणि शिबिराचे आयोजन करण्यासाठी निधी उभारण्यास मदत केली,असे गेल्या दोन आठवड्यांत २ लाख जमा करणाररी सहगल म्हणाली. एचसीजी-आयसीएस खुबचंदानी कर्करोग केंद्राकडून मी या लसी विकत घेतल्या, असेही तिने सांगितले.दरम्यान, शनिवारी, आय-टेकने एमडीएसीएस यांच्या सहकार्याने मालाड येथील त्रिवेणी समाज विकास केंद्र येथे तृतीयपंथीयांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App