भाजपशी मतभेद झाल्याच्या बातम्यांचा पूर; पण एकनाथ शिंदेंचा वेगवेगळ्या समाज घटकांशी संवाद

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

ठाणे : भाजपशी मतभेद झाल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाज घटकांशी स्वतंत्र संवाद ठेवला असून शिवसेना वेगवेगळ्या समाज घटकांचे मेळावे आयोजित करून आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे.Flood of news of differences with BJP; But Eknath Shinde’s interaction with different sections of society

बिल्लावर असोसिएशनचा रौप्य महोत्सवी सोहळा ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून बिल्लावार समाजातील समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच मनमोकळा संवाद साधला.

महर्षी नारायण गुरुजींनी दिलेला ‘एक धर्म, एक जात आणि एकच देव’ हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘शिक्षणाद्वारे स्वावलंबी बना’ हा त्यांचा संदेश समाज उन्नतीची खरी दिशा दाखवणारा असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.



मुंबई, ठाणे आणि राज्यभरात बिल्लावर समाजाच्या २२ स्थानिक शाखा कार्यरत असून ३८ हजार सभासद उत्सव, परंपरा आणि संस्कृती जपत एकोप्याने राहतात, हे कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद केले.

कोविड काळात या समाजाने केलेल्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्या काळात मोठ्या संख्येने या समाजाने मदतकार्य करत गरजूंपर्यंत अन्न पोहोचवले. संकटाच्या वेळी समाज एकत्र येऊन सेवा करतो, हे तुमच्या संस्कारांचे उदाहरण असल्याचे कौतुकोद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.

शिक्षण क्षेत्रात हा समाज करत असलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांनी तरुण पिढीसाठी संदेश दिला. उच्च शिक्षण, मेहनत आणि प्रामाणिकपणामुळे तुमच्या समाजातील मुले उद्या अधिकारी, अभियंते, डॉक्टर, वकील आणि मोठ्या पदांवर पोहोचतील असे यावेळी आवर्जून नमूद केले. तसेच या समाजाला कोणतेही सहकार्य लागल्यास #शिवसेना कायम आपल्या पाठीशी उभी राहील असे याप्रसंगी आश्वस्त केले.

यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका आणि माजी महापौर सौ. मीनाक्षी शिंदे आणि बिल्लावार समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Flood of news of differences with BJP; But Eknath Shinde’s interaction with different sections of society

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात