विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाटा, बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबाद या शहरात प्रथम फाईव्ह जी सेवा सुरु करण्यास दूरसंचार विभागाने संमती दिली आहे. पुढील वर्षाच्या मध्यास ही सेवा सुरु होण्याचा अंदाज आहे.Five G service to be launched in Mumbai, Pune, sanctioned by Department of Telecommunications
ज्या शहरांमध्ये फाईव्ह जी सेवेच्या चाचण्या सुरु आहेत तेथे ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरु होईल. भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया (व्ही) या कंपन्यांतर्फे या शहरांसह चंदीगड, जामनगर, चेन्नई, लखनौ, गांधीनगर या शहरांमध्ये या सेवेच्या चाचण्या सुरु आहेत.
विभागातर्फे पुढीलवर्षात एप्रिलपर्यंत फाईव्ह जी स्पेक्ट्रम चा लिलाव केला जाईल अशी शक्यता आहे. यासंदर्भात टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटीच्या (ट्राय) शिफारशींची प्रतीक्षा विभागाला आहे. ट्रायने यापूर्वीच यासंदभार्तील फाईव्हजी च्या किमती, लिलावातील मुद्दे इ. बाबत कंपन्यांकडून सूचना मागविल्या आहेत.
सरकारने नुकतीच मोबाईल कंपन्यांना वाढता खर्च भागविण्यासाठी 20 ते 25 टक्के दरवाढ करण्यास संमती दिली आहे. तसेच जुना कर भरण्यासाठीही वेळ दिला आहे. पुढील वर्षी या कंपन्यांना नफ्यात 40 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या कारणांमुळे त्यांना फाईव्ह जी सेवा सुरु करण्यासाठी गुंतवणुक करणे सोपे होईल, असा अंदाज आहे. या कंपन्यांचा कामचलाऊ नफा सध्याच्या पाऊण लाख कोटींवरून पुढील वर्षी एक लाखकोटींवर जाईल अशी अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App