पालकांना हवी ऑफलाईन शाळा, एससीईआरटीच्या सर्वेक्षणात स्पष्ट ; ८१ टक्के जण मुलांना पाठविण्यास राजी


वृत्तसंस्था

मुंबई : जवळपास दीड वर्ष घरातून ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर पालकांना मुलांच्या शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याची उत्सुकता आहे. एससीईआरटीच्या सर्वेक्षणात तब्बल ८१ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवायची तयारी दाखवली आहे. त्यात मुंबई विभागातील एकूण १ लाख १० हजार १९३ पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. यामध्ये पालिका विभागातील ७० हजार ८४२ तर मुंबई उपसंचालक विभागातील ३९ हजार ३५१ पालकांचा सहभाग आहे. parents now dont need online school they are for offline study mumbai survey

मुंबई विभागही अनलॉक होत असला, तरी पालिका विभागाकडून असलेले कडक निर्बंध कायम आहेत. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना लोकलमधून प्रवासाची परवानगी नसल्याने मुंबईतील पालकांचा शाळा सुरू करण्यासंदर्भातील हा प्रतिसाद अनाकलनीय असल्याच्या प्रतिक्रिया काही शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत.मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, किमान आठवड्यातून एक दिवसाआड तरी ४ ते ५ तासांचे वर्ग भरविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे.

पालकांना मुलांमध्ये जाणवत असलेले बदल

  • आळशीपणात आणि वजनात वाढ
  • दैनंदिन सवयींच्या वेळा बदलल्या
  • कानाच्या, डोळ्यांच्या तक्रारींत वाढ
  •  डोकेदुखीची समस्या जाणवते
  •  पाठदुखीच्या त्रासाने हैराण
  • चिडचिडेपणा, चंचलत, एकलकोंडेपणा वाढला
  • आत्मविश्वास, एकाग्रता, समाधान कमी झाले

parents now dont need online school they are for offline study mumbai survey

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण