प्रतिनिधी
शिर्डी : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते प्रवरानगरमध्ये देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती असेल. विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. First cooperative conclave in pravara nagar, amit shah to priside over
शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाने शाहांचा दौरा सुरु होईल. सकाळी 11.15 वाजचा दर्शनासाठी मंदिरात दाखल होणार आहेत. त्यानंतर अमित शाह सकाळी 11.45 वाजता प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. शरद पवर यांन परिषदेचे निमंत्रण नाही.
सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा येथे देशातील पहिल्या सहकार परिषदेत विचारमंथन होणार आहे. आमदार राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे पाटील सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ञ लोक यात सहभागी होणार आहेत. शिवाय सहकार विषयावर चर्चा होणार आहे.
आजच्या या सहकार परिषदेत सहकार मंत्री अमित शाह सहकार संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करणार का याकडे लक्ष लागून आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच शाह यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App