जखमी झालेल्यांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबईमधील गोरगावासीयांसाठी आजचा दिवस वाईट ठरला. कारण, येथील जय भवानी इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ५० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. तर जखमी झालेल्यांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जवळपास ३० जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. Fire in Goregaon Seven people died more than 50 were injured in a massive fire in the building parking lot
या भीषण अगीच्या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. तर आगीचे नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळाताच अग्निशामक दलाची वाहन घटनास्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. शिवाय, पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल असून, याप्रकरणी तपास सुरू आहे.
या भीषण दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, राज्य शासनाच्यावतीने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. याशिवाय दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराच खर्चही राज्य शासन करणार आहे.
जखमींवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय इमारतीच्या तळमजल्यावरी दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App