या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल एक वर्षांपूर्वीच पाडल्याने सेनापती बापट रस्ता, औंध, बाणेर येथून विद्यापीठ चौकात येते. Finally, work on the first phase of Hinjewadi to Shivajinagar Metro project started
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे.दरम्यान पहिल्या टप्प्यात पुणे विद्यापीठ चौकातील ड्रेनेज, पाणी, वीजवाहिन्यासह उपयुक्त सेवावाहिन्या स्थलांतरण या कामांची सुरूवात करण्यात आली आहे.दरम्यान हे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोचे खांब टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल एक वर्षांपूर्वीच पाडल्याने सेनापती बापट रस्ता, औंध, बाणेर येथून विद्यापीठ चौकात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते.दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची पाहणी पीएमआरडीए, पोलीस, महापालिका आणि टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी येत्या दोन दिवसात प्रायोगिक तत्त्वावर त्यांची अंमलबजावणी सुरू करावी. तसेच त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा कराव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम कधी सुरु होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App