वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यपालांकडे केली.File a case of culpable homicide against Reddy in Deepali Chavan suicide case, demands Chitra Wagh
विशेष प्रतिनिधी
अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यपालांकडे केली.
चित्रा वाघ यांनी दीपाली आत्महत्याप्रकरणी आतापर्यंतचा घटनाक्रम राज्यपालांसमोर मांडला. दीपाली गर्भवती असताना जाणूनबुजून त्यांना त्रास देण्यात आला, त्यामुळे गर्भपात झाला. सहा, सात महिन्यांचा पगार थांबवून दीपाली चव्हाण यांची आर्थिक कोंडी करण्यात आली.
वेळोवेळी अपमानित करण्यात आले. दीपाली यांना झालेल्या त्रासाची वेळोवेळी कल्पना रेड्डी यांना दिली होती, पण त्यांनी दुर्लक्ष केले. रेड्डी यांनी वेळीच लक्ष दिले असते, तर कदाचित दीपाली यांच्यावर आतमहत्येची वेळ आली नसती.
त्यामुळे रेड्डी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांची भूमिका संदिग्ध आहे असा आरोप करत या प्रकरणाचा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणीही वाघ यांनी केली.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App