दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मूळाशी मेळघाटातील अवैध धंदे; प्रकाश आंबेडकरांचा आरोप; महाराष्ट्रात सरकार वाघांचे की लांडग्यांचे??

विशेष प्रतिनिधी

मुंबई – धारणी आणि मेळघाट अभयारण्यातील वाघ कमी होणे, वाघाच्या कातड्याची, नखांची तस्करी, सागाची अवैध विक्री हे सर्व गैरप्रकार दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मूळाशी असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. येत्या आठवडाभरात ठाकरे – पवार सरकारने योग्य कारवाई केली नाही, तर सर्व पुरावे जाहीर करू, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला आहे. Dipali Chavan Suicide Case illegal trade in melghat led to deepali`s suicide, allaged prakash ambedkar

मेळघाटात कामे करणाऱ्या विविध एनजीओंची चौकशी करावी. त्यांच्याकडे आदिवासींच्या किती जमिनी आहेत हे देखील स्पष्ट ठाकरे – पवार सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना फक्त निलंबित करून चालणार नाही. रेड्डींवर गुन्ह्याला प्रोत्साहीत करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेडकरांनी केली. राज्यातलं सरकार वाघांचे आहे की लांडग्यांचे आहे हे समजत नाही, असा टोलाही आंबेडकरांनी लगावलाय.दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी ताबडतोब कारवाई न करता वनखात्याचा कार्यभार असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच दिवसांनंतर निर्णय घेऊन एम.एस. रेड्डी यांचे मंगळवारी निलंबन करण्याचे आदेश दिले.

राज्यात संतापाचे वातावरण पाहून महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

उपवन संरक्षक शिवकुमार याच्या छळाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. कच्च्या रस्त्यावरून ड्युटीनिमित्त फिरायला लावताना अ‍ॅबॉर्शन झाल्यावर त्यांना सुट्टी देण्यात आली नाही. अश्लिल बोलून मानसिक छळ करण्यात आला, असे दीपाली यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

आत्महत्या करण्यापूर्वी शिवकुमार यांच्याविषयी त्यांनी अप्पर वनसंरक्षक रेड्डी यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

धक्कादायक बाब म्हणजे वनखात्याच्या वतीने करण्यात आलेल्या कामांचे पैसेही दीपाली चव्हाण यांना मिळाले नाहीत. गावांचे पुनर्वसन करण्यासाठीचा निधी त्यांना नाकारण्यात आला. या गावांमध्ये वनपाल आणि वनरक्षकांची पदे भरली नाहीत. त्यामुळे दीपाली यांच्यावर कामाचा ताण वाढला होता.

आपण हे अनेकदा लिहूनही शिवकुमार यांच्यावर कारवाई होत नाही याचे कारण वरिष्ठांचाच त्यांच्या डोक्यावर हात आहे, अशी खंतही दीपाली चव्हाण यांनी व्यक्त केली होती. दीपाली चव्हाण यांनी थेट आरोप करूनही रेड्डी यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. आता शिवकुमारला अटक झाली आहे आणि रेड्डी निलंबित झाले आहेत.

Dipali Chavan Suicide Case illegal trade in melghat led to deepali`s suicide, allaged prakash ambedkar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*