राज्यसभा निवडणुकीची धास्ती आणि विधान परिषदेसाठी इच्छुकांची सर्वपक्षीय गर्दी!!

प्रतिनिधी

मुंबई : एका बाजूला राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्याकरता घोडेबाजार सुरु आहे. त्यातच आता विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषदेसाठी आतापासूनच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. Fear of Rajya Sabha elections and all-party crowd of aspirants for the Legislative Council

शिवसेनेकडून ही नावे चर्चेत 

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटू नये, यासाठी शिवसेनेने आमदारांना मुंबईतील हॉटेलवर नेले आहे. हॉटेल ट्रायडेंट येथे महाविकास आघाडीचे सर्व पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. त्याठिकाणी ते चर्चा करणार आहेत. राज्यसभेची निवडणूक १० जून रोजी होणार आहे. मात्र यातच आता शिवसेनेने विधान परिषदेची तयारी सुरू केली आहे. दोन नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


PANKAJA MUNDE PRESS : तुमच्या महाराष्ट्रात चाललंय काय? असं लोक मला विचारतात; पंकजा मुंडेंचा ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर निशाणा


२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पाणी सोडणारे सचिन अहिर यांचे नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी सर्वांत पुढे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या माध्यमातून सचिन अहिर यांचे शिवसेनेकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना नेते आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चाही आहे. २०१९मध्ये पाडवी यांना याच मतदारसंघात काँग्रेस नेते के.सी. पाडवी यांच्याकडून अवघ्या २ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे विधान परिषदेसाठी अक्कलकुवातून आमशा पाडवी अशा स्थानिक नेतृत्वाला शिवसेनेकडून संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणुकांसाठी आता शिवसेनेकडून नावे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस कुणाला देणार संधी? 

काँग्रेसकडून प्रवक्ते राजू वाघमारे, सचिन सावंत यांना संधी देऊ शकते. यानिमित्ताने काँग्रेसही विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी करत आहे. त्यासाठी इच्छूकांची नवे समोर येऊ लागली आहेत.

भाजप करणार पुर्नवसन? 

भाजप मात्र माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनाही आमदारकी देण्याची शक्यता आहे.

Fear of Rajya Sabha elections and all-party crowd of aspirants for the Legislative Council

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात