महावितरणने कृषीपंपाची वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. Farmers in trouble due to stubbornness of MSEDCL; Those farmers do not get DP if they do not pay their electricity bills
विशेष प्रतिनिधी
जालना : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचं अक्षरशः दिवाळ निघालं आहे. दिवाळी सुद्धा शेतकऱ्यांना गोड लागली नाही.दरम्यान महावितरणने कृषीपंपाची वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
महावितरणच्या या आडमुठेपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.ही मोहीम तात्काळ थांबवा,अशी मागणी युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर युवासेनेचे बंटीसेठ आटोळे,साष्टपिंपळगावचे विभाग प्रमुख रजनीश कनके,रमेश काळे,सुशांत गांगुर्डे,राहुल हार्दिक,सचिन देवकाते,राहुल हारे याच्या स्वाक्षरी आहेत.
या निवेदनात म्हंटले आहे की,सध्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे.तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही.यातून शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या संकटात अजून एक वाढ म्हणून महावितरणने आडमुठी भूमिका घेत सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या डीपी या नादुरुस्त झाल्या आहेत.त्यांना त्या दुरुस्ती करून देण्यासाठी सक्तीची वीजबिल वसुली सुरू आहे.सध्या शेतमालाला पाणी असून वीज नसल्याने पाणी देता येत नाही.शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा त्यांच्या खात्यात जमा झाले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App