एखाद्या शेतकऱ्याला 1100 किलोपेक्षा जास्त कांदा विकून हातात केवळ 13 रुपये मिळत असतील, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण दुर्दैवाने ही बाब खरी आहे. हिवाळ्याच्या हंगामात कांद्याचे भाव वाढले असतानाही सोलापूरमधील एका शेतकऱ्याने 1,123 किलो कांदा विकून केवळ 13 रुपये कमावले. ही पावती सध्या इंटरेनटवर व्हायरल होत असून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही यावरून सरकारला उद्विग्न सवाल केला आहे. farmer sold 1123 kg of onion, got only 13 rupees, Farmer Leader Ex MP Raju Shetty criticized Government
प्रतिनिधी
मुंबई : एखाद्या शेतकऱ्याला 1100 किलोपेक्षा जास्त कांदा विकून हातात केवळ 13 रुपये मिळत असतील, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण दुर्दैवाने ही बाब खरी आहे. हिवाळ्याच्या हंगामात कांद्याचे भाव वाढले असतानाही सोलापूरमधील एका शेतकऱ्याने 1,123 किलो कांदा विकून केवळ 13 रुपये कमावले. ही पावती सध्या इंटरेनटवर व्हायरल होत असून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही यावरून सरकारला उद्विग्न सवाल केला आहे.
या माझ्या बळीराजाला १६६५ रूपये मिळाले. हमाली , तोलाई , मोटार भाडे वजा जाता १३ रूपये बापू कावडे या शेतक-यास शिल्लक राहिले. या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ?@narendramodi @PMOIndia @ANI @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dadajibhuse @nstomar @PawarSpeaks @PiyushGoyal — Raju Shetti (@rajushetti) December 2, 2021
या माझ्या बळीराजाला १६६५ रूपये मिळाले. हमाली , तोलाई , मोटार भाडे वजा जाता १३ रूपये बापू कावडे या शेतक-यास शिल्लक राहिले.
या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ?@narendramodi @PMOIndia @ANI @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dadajibhuse @nstomar @PawarSpeaks @PiyushGoyal
— Raju Shetti (@rajushetti) December 2, 2021
बापू कवडे या शेतकऱ्याने सोलापुरातील एका कमिशन एजंटमार्फत केलेल्या विक्रीची पावती म्हणून 1,123 किलो कांदा बाजारात पाठवला आणि त्या बदल्यात त्याला केवळ 1,665.50 रुपये मिळाले. यामध्ये शेतातून कमिशन एजंटच्या दुकानात माल नेण्यासाठी मजुरीचा खर्च, वजनाचे शुल्क आणि वाहतूक खर्च समाविष्ट आहे, तर उत्पादन खर्च 1,651.98 रुपये आहे. सरतेशेवटी शेतकऱ्याला केवळ 13 रुपये मिळाले आहेत.
कवडे यांच्या विक्रीची पावती ट्विट करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि लोकसभेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बापू कावडे या शेतकर्यांने २४ पोते कांदे रूद्रेश पाटील या व्यापा-याला विक्री केले. जवळपास ११२३ किलो कांदे विकून या माझ्या बळीराजाला १६६५ रूपये मिळाले. हमाली , तोलाई , मोटार भाडे वजा जाता १३ रूपये बापू कावडे या शेतक-यास शिल्लक राहिले. या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का? ” त्यांच्या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App