प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आज नाशिकमध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडला. भाजप कार्यकर्त्यांच्या शहर – जिल्हा पातळीवरील मेळाव्यात बोलताना त्यांनी “दत्तक” या शब्दाचा अर्थ देखील विशद करून सांगितला.Fadnavis slammed BJP opponents in Nashik, explaining the meaning of the word “adopted”.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये तुम्ही भाजपला नाशिकमध्ये बहुमत द्या. मी नाशिकला दत्तक घेतो, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य त्यावेळी खूप गाजले होते. नाशकात खरोखर भाजपला बहुमत मिळाले मात्र त्यानंतर फडणवीस यांच्यावर “दत्तक” या शब्दावरून जोरदार टीकास्त्रही सोडण्यात येत होते.
कोणी कितीही एक येऊ द्या, जनता भाजपासोबत आहे.निवडणुका ‘अर्थमॅटिक’ने नाही, तर ‘पॉलिटिकल केमेस्ट्री’ने जिंकल्या जातात, हे लक्षात असू द्या : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/IgM3pJSOVd — @OfficeOfDevendra (@Devendra_Office) February 21, 2022
कोणी कितीही एक येऊ द्या, जनता भाजपासोबत आहे.निवडणुका ‘अर्थमॅटिक’ने नाही, तर ‘पॉलिटिकल केमेस्ट्री’ने जिंकल्या जातात, हे लक्षात असू द्या : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/IgM3pJSOVd
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) February 21, 2022
या पार्श्वभूमीवर आज “दत्तक” या शब्दावर देवेंद्र फडणवीस यांनी नवे भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, की काही लोकांना मी नाशिक दत्तक घेतो म्हणालो, तेव्हा खूप दुःख झाले होते. कारण त्यांना नाशिक ही आपली जहागिरी वाटत होती. पण “दत्तक” घेणे म्हणजे रोज घेऊन महापालिका चालवणे नव्हे, किंवा कामाचे वाटप करून त्यात दलाली खाणेही नव्हे, तर दत्तक घेणे म्हणजे नाशिकसाठी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना कल्पकतेने राबविणे होते. नाशिकमध्ये मेट्रो आम्हाला सुरू करायची होती. परंतु दोनदा ते फिजिबल नसल्याचा अहवाल आला. त्यामुळे जगात वेगळ्या पद्धतीच्या कोणत्या मेट्रो चालतात हे बघून नाशिक साठी सुयोग्य मेट्रो माझ्या सरकारच्या काळात दिली. पण महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने मेट्रो अडवली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
या मेळाव्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच कार्यक्रमाला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे आमदार, खासदार, महापौर, विविध शहरांचे नगराध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी, शहराध्यक्ष, शहर प्रभारी आदी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App