विशेष प्रतिनिधी
मुबंई : लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी आजवर एकही स्टेटमेंट दिले नाहीये. याबद्दल प्रियांका गांधी यांनी मोदी यांच्यावर कडाडून टीका देखील केली होती. आता या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत आहेत. देशभरातून भाजप सरकार विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. अशावेळी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये त्यामुळे या दोन प्रमुख नेत्यांनी धारण केलेल्या मौनावरुन देशभरात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Fadnavis said on the silence maintained by Prime Minister Modi and Amit Shah in the Lakhimpur Kheri violence case …
यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. आपली बाजू मांडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला भाजप नेत्यांनी कडाडून टीका केली आहे.
मात्र सुप्रिया सुळेंनी भारताच्या दोन प्रमुख नेत्यांनी म्हणजे मोदी आणि शहा यांनी साधलेल्या चुप्पी वर प्रश्न उठवून जाब विचारला होता. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस आपल्या खुलाशामध्ये म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जर काँग्रेस नेत्यांना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसेल, तर त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करत राहावेत. मोदींनी शेतकरी सन्मान योजनेसारखी योजना आणली. त्यातून त्यांची शेतकऱ्यांविषयी असणारी संवेदना आणि आपलेपणाची भावना दिसून येते.
Lakhimpur Kheri Case : केंद्राला घेरण्याची तयारी, काँग्रेसने राष्ट्रपती कोविंद यांना भेटण्याची वेळ मागितली, राहुल गांधींसोबत शिष्टमंडळात 7 नेत्यांचा समावेश
पुढे ते असेही म्हणाले की, आज जो बंद पाळला पाळण्यात येत आहे तो फक्त ढोंगीपणाचा एक कळस आहे. कारण ही तीच मंडळीआहेत, ज्या मंडळींनी मावळ मध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या घटनेची आठवन करून देत ते पुढे म्हणाले, आत्ता जे बंद पाळत आहेत, बंद पाळण्याचे आव्हान करत आहेत त्या लोकांना नैतिकता तरी आहे का? असा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App