फडणवीसांचे ठाकरेंना खडे बोल, मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही, एफएसआय, टीडीआरचे व्यवहार करणारे आम्हाला नको

Fadnavis' harsh words to Thackeray, will not allow deportation of Marathi people from Mumbai

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठी माणसासाठी लढतो, अशा प्रकारच्या वल्गना केल्या त्यांचं राज्य आल्यानंतर 2019चा हा शासन निर्णय त्यांनी गुंडाळून बाजूला ठेवला. त्यांनी बिल्डर धार्जिणे धोरण महाराष्ट्रात आणले. सामान्य मराठी माणसाचे स्वप्न त्यांनी गुंडाळून ठेवले, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. Fadnavis’ harsh words to Thackeray, will not allow deportation of Marathi people from Mumbai

मुंबईत ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस म्हणाले, बीएमसीमध्ये काही लोकांनी 25 वर्षे राज्य केले. त्यांनी केवळ वर्षानुवर्षे तीच आश्वासने दिली. निवडणुका संपल्या की त्या आश्वासनांना विसरून जायचे.

फडणवीस म्हणाले की, श्रमिकांनी श्रम करून बनवलेली ही मुंबई आहे. दहा-वीस टक्के लोक चकचकीत इमारतीत राहतात त्यांची ही मुंबई नाही. आम्हाला गेल्या दीड वर्षात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आम्ही जेवढे करता येईल तेवढं केलं. रक्तामासांची माणसं ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. एफएसआय आणि टीडीआर चे व्यवहार करणारे आमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही.


विदर्भ बनणार नव्या भारताचे ‘बेस्ट इन्वेस्टमेंट ‘डेस्टिनेशन’ – देवेंद्र फडणवीस


म्हणून मुंबईत मराठी माणसाला घर नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील मराठी माणूस स्वत:च घर का मिळवू शकत नाही. कोणत्या अडचणी येतात हे पाहून आपण शासन निर्णय घेतले. मात्र, 2019 मध्ये आपलं सरकार गेलं. ज्यांनी वारंवार आम्ही मराठी माणसासाठी आहोत. मराठी माणसासाठी लढतो, अशा प्रकारच्या वल्गना केल्या त्यांच राज्य आल्यानंतर 2019 चा हा शासन निर्णय त्यांनी गुंडाळून बाजूला ठेवला. त्यांनी बिल्डर धार्जिणे धोरण त्यांनी महाराष्ट्रात आणले. सामान्य मराठी माणसाचे स्वप्न त्यांनी गुंडाळून ठेवले.

ते म्हणाले, आपल्या आशीर्वादाने मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात आपण पुन्हा काम सुरु केले. मुंबई, ठाण्यातील गृहनिर्माणाची परिषद दरेकर यांनी घेतली. बिल्डरांच्या जाळ्यातील सामन्यांना घर घेऊन देण्यासाठी काय करता येईल, यासाठी 16 मागण्या माझ्यासमोर ठेवण्यात आल्या. त्या सोळा मागण्या मी पूर्ण केल्या. जीआर काढला. शासन निर्णय काढला आणि अंमलबजावणी देखील सुरु केली. ती अंमलबजावणी झाल्याबद्दल धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम घेतलाय, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

फडणवीसांनी म्हटले की, पुढील दहा वर्षांनी माझ्यासमोर बसलेला प्रत्येक माणसाला हक्काचा घर हे त्याचा असेल, अशा करिता मुंबईकरता तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. तुमच्या आशीर्वादाची ताकद ही इतकी जबरदस्त आहे की हे परिवर्तन आम्ही करून दाखवू.

अभुयदय नगरचा सीएनडीचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे येण्याआधी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ती फाईल आपण संपूर्ण पूर्ण केली आहे सर्व काम केलं आहे. ती फाईल कॅबिनेट पर्यंत पोहोचवली आहे आणि मला मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्या वतीने तुम्ही घोषणा करा की पुढच्या कॅबिनेटमध्ये अभ्युदय नगरच्या सीएनडीचा विकास करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Fadnavis’ harsh words to Thackeray, will not allow deportation of Marathi people from Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात