विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातला बदली घोटाळा बाहेर काढणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी काढल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज आक्रमक भाषेत पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. ते उद्या सकाळी 11 वाजता बीकेसीतल्या सायबर ठाण्यामध्ये उत्तर द्यायला जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना एकदम बचावात्मक पवित्र्यात जावे लागले. Fadanavis – NCP – Raut police inquiry
देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी माहिती घेण्यासाठी बोलावले असेल. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी किंवा त्यांना अडचणीत आणण्यासाठी बोलावले नसेल, असे उत्तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिले. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नोटीचीचा विषय हा सरकारचा आहे. आपल्याशी त्याचा काही संबंध नाही, असे सांगत संजय राऊत यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पोलिसांच्या नोटिशीचा मुद्द्यावर बोलताना मी विरोधी पक्षनेता आहे. माझ्याकडे प्रिव्हिलेज आहे. कोणती माहिती कोणाकडून आली याचा सोर्स सांगणे हे माझ्यावर कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही, असे स्पष्ट केले होते.
एक प्रकारे फडणवीस यांनी पोलिसांच्या नोटिशीला कायद्याच्या कचाट्यात पकडले. गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधल्याचे मानले गेले. फडणवीस यांच्या या मुद्द्यावर जयंत पाटील यांना विचारले असता ते एकदम बचावात्मक पवित्र्यात गेले. देवेंद्र फडणवीस यांना फक्त माहिती विचारण्यासाठी पोलिसांनी बोलावले असेल. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी किंवा त्यांना अडचणीत आणण्यासाठी बोलावले नसेल, असे उत्तर देऊन जयंत पाटील मोकळे झाले. संजय राऊत यांनी त्यापुढे जाऊन हा विषय मुळातच सरकारचा आहे. आपला त्याच्याशी काही संबंध नाही म्हणून हात झटकून ते निघून गेले.
एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचा पाहिला कायदेशीर झटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी या निमित्ताने अनुभवल्याचे या निमित्ताने दिसून आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App