मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडल्याचे म्हणत भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. Face to face: Shiv Sena loses 25 years in alliance – Uddhav Thackeray; So why is Balasaheb’s decision wrong? Fadnavis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडल्याचे म्हणत भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की ,”मी बाहेर पडणार आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून तसेच जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार.तसेच विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही.कारण हे काळजीवाहू विरोधक कधीकाळी आपले मित्र होते.तसेच 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली आणि आजही तेच माझं मत कायम आहे.”
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की , “राजकारण म्हणजे गजकरण आहे असं बाळासाहेब म्हणायचे.त्यामुळे राजकारण म्हणून आता विरोधक आता काहीही खाजवतंय. शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली. हिंदुत्वासाठी सत्ता पाहिजे होती’, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की , ” बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते.दरम्यान या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. मग त्यांच्या हयातीत त्यांनी युती कायम ठेवली. याचा अर्थ असा की बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.
फडणवीस म्हणाले की , “भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे का असा सवाल आमच्या मनात येतो. भाजपच्या सोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचा पक्ष होते. आता भाजप सोडल्यावर चौथ्या क्रमंकावर गेले. मग कोणासोबत सडले. ”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App