वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून आयटी इंजनियर महिलेवर बलात्कार, विवस्त्र करून विनयभंग केला Rape of a woman at a birthday party; molestation by undressing
विशेष प्रतिनिधी
पिंपरी : आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत संगणक अभियंता असलेल्या महिलेला वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याछा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित ३२ वर्षीय महिला आणि आरोपी हे दोघे संगणक अभियंता आहेत. त्यांची ओळख लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर झाली होती. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
या दोघांचा दुसरा विवाह होणार होता. लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर त्यांची ओळख झाली होती. आरोपीने लग्न करायचं आहे सांगत पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यांच्यात ओळख झाल्यानंतर फोन, चॅटिंग सुरु झालं. त्यांच्यातील भेटीदेखील वाढल्या होत्या. २१ नोव्हेंबरला पीडित महिलेला आरोपीने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावले. पार्टी झाल्यानंतर ‘तू एकटी घरी जाऊ नकोस उशीर झाला आहे, उद्या सकाळी जा’ असे सांगून पीडितेला थांबवून घेतलं. पीडितेला घरी घेऊन गेला अन् तिथे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला.
पीडितेला आरोपीने विवस्त्र करून विनयभंग केला.नंतर आरोपीने पीडित महिलेशी संपर्क तोडला. लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार झाल्याचं समजल्यानंतर महिला तणावात होती. पीडित महिलेने तणावातून बाहेर येताच आणि आरोपीचा संपर्क न झाल्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ३४ वर्षीय आरोपीविरोधात विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App