सध्या देशात प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे.या दिवसासाठी तिरंगा बाजारात उपलब्ध झाले आहेत. Be careful! Now it will be illegal to drive a tricolor on the occasion of Republic Day, know because
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या भारत देशाचा ध्वज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आणि राज्यांचे स्थापना दिवस या दिवशी फडकविण्यात येतो. तसेच या दिवशी सार्वजनिक ठिकाणे,सरकारी कार्यालय, तसेच लहान छोटी गावे अश्या सर्व ठिकाणी ध्वजारोहण केले जाते.विशेष म्हणजे देशाच्या कोपऱ्यापर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
दरम्यान सध्या देशात प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे.या दिवसासाठी तिरंगा बाजारात उपलब्ध झाले आहेत.महत्वाची बाब म्हणजे लोक हे ध्वज त्यांच्या कपड्यांना लावतात.दरम्यान काही लोक आपल्या गाडीला देखील लावतात. परंतु ध्वज फडकवण्यासाठी अनेक कायदेशीर नियम आहेत आणि आपल्याला ते नियम माहित नसतात.
राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे. यामध्ये ध्वजारोहणाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.तसेच राष्ट्रध्वजाचा वापर कसा करावा हे सांगण्यात आले आहे. या ध्वजसंहितेमध्ये काही लोकांना कारमध्ये (मोटार-कार) झेंडा लावण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि नायब राज्यपाल, पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री, मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या गाडीत झेंडा लावू शकतात.
2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक भारतीयाला तिरंगा फडकवण्याचा अधिकार आहे. मात्र, गाडीवर तिरंगा लावण्याचा अधिकार फार कमी लोकांना मिळाला आहे आणि सामान्य माणूस तो झेंडा गाडीसमोर लावण्यासाठी वापरू शकत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App