Exit polls : पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये मतदारांनी पवार ब्रँडचा पुरता उडवला बोऱ्या!!

नाशिक : महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये पवार ब्रँडने फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर लक्ष केंद्रित केले होते. “पवार बुद्धीचे” अनेक पत्रकार या ब्रँडच्या प्रमोशनसाठी राबत होते. परंतु, प्रत्यक्षात पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी पवार ब्रँडचा पुरता बोऱ्या उडवल्याचे राजाकीय चित्र एक्झिट पोल मधून समोर आले.

– पवार ब्रँडचे पिटले होते ढोल

महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार हे दोनच ब्रँड चालतील असे ढोल आणि टिमक्या “पवार बुद्धीच्या” अनेक पत्रकारांनी वाजविल्या होत्या. यामध्ये संजय राऊत धरून अन्य अनेक मोठ्या पत्रकारांचा समावेश होता. शरद पवार आणि अजित पवार कसे “डाव” टाकतात, कशा “खेळ्या” करतात, विरोधकांना कसे चकवतात, त्यांना कसे नेस्तनाबूत करतात, याची बहारदार वर्णने “पवार बुद्धीचे” अनेक पत्रकार करत होते. परंतु त्यांचे सगळे मुसळ केरात गेले.

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी पवार ब्रँडच्या ठिकऱ्या केल्या. पवार काका – पुतण्यांची दोन्ही कडची सत्ता तर हिसकावलीच, पण त्यांना पुन्हा सत्तेवर येऊन दिले नाही. हेच राजकीय वास्तव एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आले.

– पुण्यात भाजपच 1 नंबर

पुण्यात 93 ते 96 जागा मिळवून भाजपच एक नंबर वर राहिला तर पवार काका – पुतण्यांच्या आघाडीला 43 जागांवर समाधान मानावे लागल्याचे चित्र एक्झिट पोल मधून समोर आले. शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला आठ अशा सिंगल डिजिट जागांवर समाधान मानावे लागले.

– महेश दादा अजितदादांवर भारी

पिंपरी चिंचवड मध्ये महेश दादाच अजितदादांच्या दादागिरी वर बाहेरी पडले. तिथे देवा भाऊंनी महेश दादांच्या बाहूंमध्ये असे काही बळ भरले, की त्यामुळे महेश दादांना धोबीपछाड आणि घुटना डावावर पराभूत करण्याच्या अजितदादांच्या वल्गना हवेत विरल्याचे स्पष्ट झाले. पिंपरी चिंचवड मध्ये 70 जागा मिळवून भाजप आघाडीवर राहील. दोन्ही राष्ट्रवादींना मिळून 49 जागांवर समाधान मानावे लागेल असे साम टीव्हीने केलेल्या एक्झिट पोल मधून समोर आले.

या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसारच उद्या महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी पवार नावाच्या ब्रँडचा पुरता बोऱ्या वाजवला राजकीय वास्तव मान्य करावे लागेल.

Exit Poll Pune Pimpri Chichwad BJP No.1

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात