जे लोक एक लोगो बनवू शकत नाहीत, ते कसे एकत्र जोडले जाणार? असा सवालही मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत आज विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक एकीकडे पार पडत असताना, दुसरकीडे राज्यातील सत्ताधारी महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी विरोधकांच्या टीकांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यावरून त्यांना टोमणाही मारल्याचे दिसून आले. Eknath Shinde taunts Uddhav Thackeray
विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीअगोदर मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते. यावेळी त्यांना पंतप्रधानपदाबाबत प्रश्न विचारला गेला होता. “पंतप्रधानपदासाठी तुमचंही नाव घेतलं जात आहे, त्याविषयी काय सांगाल?” अशी विचारणा माध्यम प्रतिनिधीकडून केली गेली असता, उद्धव ठाकरेंनी त्यावर “हां, मी आता लगेच जाऊन घेतो शपथ”, अशी मिश्किल टिप्पणी दिली होती.
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या बैठकीत बोलताना टोमणा मारला. ”काही लोकांना पत्रकारांनी विचारलं की तुमचंही नाव पंतप्रधान म्हणून घेत आहेत. तर म्हणे ‘हां मी जाऊन लगेच शपथ घेतो’. पण शपथ कुठून घेणार? घरातून की ऑनलाईन? की वर्क फ्रॉम होम? ओथ फ्रॉम होम? फेसबुकवरून? ” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
याशिवाय विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मोदींची बदनामी करण्याचं काम परदेशात जाऊन काही लोक करतात, खरंतर तोच देशद्रोह आहे. त्यामुळेच ही इंडिया नाही, इंडी आघाडी आहे. यूपीएचं नाव कायम ठेवायला त्यांना लाज वाटली. कारण यूपीएनं एवढा सपाटून मार खाल्ला, त्यामुळे नवीन इंडिया आघाडी तयार केली. ”
याशिवाय, ”जे लोक एक लोगो बनवू शकत नाहीत, ते कसे एकत्र जोडले जाणार? पंतप्रधानपदावर एकमत होणं तर लांबची गोष्ट आहे. मग ते लोकांबरोबर कसे जोडले जातील? यांची आघाडी म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. तसेच, मुंबईत हवा व ध्वनीप्रदूषण वाढलंय. कारण गेल्या दोन दिवसांत इथल्या हवेत खोटारडेपणा आणि अहंकार मिसळलाय. कुणामुळे त्याची तु्म्ही माहिती काढा. संपूर्ण भारतातून इथे मुंबईत भ्रष्टाचाराचे वारे वाहात आलेत की काय अशी वातावरण निर्मिती इथे झाली आहे. ज्यांनी हयातभर फक्त भ्रष्टाचारच केला, त्यांच्या टोळ्या हयातमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या.” असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App