प्रतिनिधी
ठाणे : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती तिला ब्रेकच लागत नव्हता अशा शब्दात हिणवले होते पण आता ठाण्यातल्या रिक्षावाल्यांनी मात्र होय, मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री!!, असे फलक लावून एकनाथ शिंदे यांचे जोरदार समर्थन केले आहे. इतकेच नाही, तर ठाण्यातल्या रिक्षावर चालकांनी “मी रिक्षाचालक मी मुख्यमंत्री” असे टी-शर्ट देखील तयार करून आता ते घालूनच रिक्षा फिरवताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून वेगळी क्रेझ तयार झालेली दिसते आहे. Eknath shinde supporters reacted big posters of rikshwawala in thane
नरेंद्र मोदी हे चहावाले पंतप्रधान म्हणून जगप्रसिद्ध आहेतच. पण त्यांना काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी चायवाला म्हणून डिवचले होते. ते पंतप्रधान बनू शकणार नाहीतच, उलट त्यांना कुठे चहाचा स्टॉल लावायचा असेल तर आम्ही काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांना छोटीशी जागा उपलब्ध करून देऊ, असे हिणकच उद्गार मणिशंकर अय्यर यांनी काढले होते. परंतु, भारतातल्या जनतेने भरघोस पाठिंबा दिल्यामुळे मोदी पंतप्रधान झालेच. एक प्रकारे देशातल्या सर्वसामान्य चहावाल्याला त्यातून प्रतिष्ठा प्राप्त झाली. वाराणसीच्या घाटावर एका बंगाली चहावाल्याने त्यांना प्रत्यक्ष चहा दिल्यानंतर त्याचीही क्रेझ उत्तर प्रदेशात झाली होती.
आता एकनाथ शिंदे यांच्यासारखा ठाण्यातल्या सामान्य रिक्षाचालक मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्षा चालकांचा गौरव आणि सन्मान वाढला आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेकच लागला नाही लागत नव्हता, असे हिणवल्यामुळे रिक्षा चालकांच्या रागात भर पडली. परंतु, त्यांनी आपला राग वेगळ्या पद्धतीने व्यक्त करून ठाण्यात ठिकठिकाणी “मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री”, असे फलक तर लावलेच पण त्याच घोषणेचे टी-शर्ट घालून देखील ते रिक्षा फिरवायला लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App