
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Eknath Shinde शरद पवार यांची गुगली राजकारणात अनेकांना कळत नाही. पण माझे आणि शरद पवार यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत असे कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.Eknath Shinde
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मला पुरस्कार देणारे जरी शरद पवार असले तरी ते देशाचे क्रिकेटपटू शिंदे यांचे जावई आहेत, कधी-कधी ते बाजूला बसलेल्या लोकांना गुगली टाकतात. पण माझ्यावर आजपर्यंत शरद पवार यांनी कधी गुगली टाकली नाही,टाकणार नाही अस वाटत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्याकडून मला मिळालेला पुरस्कार हा वेगळा आहे. विचारधारा वेगळी असली तरीही वैयक्तिक संबंध हे प्रत्येकाने टिकवायचे असतात. राजकारणातही मी एक पातळी सोडून कधीही कुणावर टीका केली नाही. राजकारणात अनेक लोकांना माहीत आहे की माझ्यावर अनेक आरोप झाले आहेत. मी आरोपांना कामांतून उत्तर देत गेलो. हे संस्कार माझ्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आहेत. अडीच वर्षांत मला चांगली कामगिरी करता आली. मी मुख्यमंत्री झालो तेव्हाच मला माहीत होतं की आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळात मराठी मातीसाठी जितकं शक्य तितकं करायचं असं मी ठरवलं होतं. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
पुरस्कार, सन्मान हे विचारवंत, साहित्यिकांसाठी असतात. राजकारण्यांना कमी दिले जातात. आज मिळालेला पुरस्कार स्वीकारताना थोडा संकोच होता. मात्र प्रेमही होतं. मला पुरस्कार प्रदान केलात त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे याची जाणीवही मला आहे. चांगलं काम करण्याचा हुरुप येतो अशा शब्दांत शिंदे यांनी आभार मानले.
शिंदे म्हणाले, शरद पवारांसारख्या जाणत्या नेत्याच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. महादजी शिंदे यांचं गाव सातारा जिल्ह्यातील कणेर खेड हे आहे. या लढवय्याच्या भूमित माझा जन्म झाला आहे हे मी माझं भाग्य समजतो. पुरस्कार ज्यांच्या नावे आहे ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे, पुरस्कार सोहळ्यात उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. ज्यांनी मला पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीही देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे एकत्र आले. सदू शिंदे हे भारताचे गुगली बॉलर होते. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे. शरद पवारांची गुगलीही अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांना गुगली टाकतात. त्यांनी आजवर मला गुगली टाकलेली नाही यापुढेही टाकणार नाहीत असा विश्वास आहे.
महादजी शिंदे हे आभाळाएवढं व्यक्तिमत्व होतं. ते महाप्रतापी रणधुरंधर होते. आदर्श शासक होते, कुशल योद्धे होते आणि खऱ्या अर्थाने महानायक होते. पानिपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी स्थिती तेव्हा निर्माण झाली होती. कुठेही आशेचा किरण नव्हता. अशा परिस्थितीत महादजी शिंदेंनी पराक्रम गाजवून दिल्ली जिंकली आणि भगवा फडकवला हा इतिहास आहे. १० फेब्रुवारीला म्हणजे कालच या पराक्रमाला २५४ वर्षे पूर्ण झाली असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde said, Sharad Pawar has never cast a googali on me
महत्वाच्या बातम्या
- Savitribai Phule ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेचे योगदान पर्यटन विभाग विसरला!
- जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, लक्ष्मण हाके यांचा आरोप
- Amanatullah Khan आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी वाढल्या!
- Ranveer Allahabadia रणवीर अलाहाबादिया, समय रैना सह सर्वांना अश्लील कमेंट बद्दल राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; 17 फेब्रुवारीला दिल्लीत सुनावणी!!