विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राची सत्ता मिळवायचीच या हेतूने शरद पवार कुठलही नवीन गठजोड करतील, अशा अटकळी बांधून विविध मराठी माध्यमांनी बातम्या चालविल्या. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या अटकळी फेटाळून लावल्या. निवडणुकीनंतर शरद पवारांबरोबर एकत्र येण्याची शक्यता शिंदे यांनी ठामपणे फेटाळून लावली. Eknath Shinde
मध्यंतरी शरद पवारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्या दोन-तीन वेळा भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यासाठी वेगवेगळी कारणे होती. परंतु, त्या भेटीच्या बातम्या देताना मराठी माध्यमांनी निवडणुकीनंतर शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना बाजूला सरून एकनाथ शिंदे यांच्याशी राजकीय साटे लोटे करतील, अशा बातम्या चालविल्या होत्या. Eknath Shinde
निवडणूक प्रचारात एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकमेकांवर टीका करत नाहीत. शिंदे फक्त काँग्रेसला टार्गेट करत असल्याचे, तर पवार फक्त फडणवीस यांना टार्गेट असल्याचे मराठी माध्यमांनी निदर्शनास आणून दिले. त्यातून शरद पवारांची कसेही करून सत्ता मिळवायची ही प्रवृत्ती मराठी माध्यमांनी समोर आणली होती.
मात्र या सगळ्या बातम्या, अटकळी आणि शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावल्या. भाजपशी शिवसेनेची झालेली युती वैचारिक अधिष्ठानावर आधारित आहे. बाळासाहेब ठाकरे यांची तीन स्वप्नं होती, अयोध्येत राम मंदिर बांधायचे, काश्मीरमधून 370 कलम हटवायचे आणि सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे. ही तिन्ही स्वप्ने बाळासाहेबांच्या मुलाने किंवा अन्य कोणी पूर्ण केली नाहीत, तर ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पूर्ण केली, याकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App